‘धन्या’ कादंबरीतील नायक हा प्रामाणिक व कष्टाळू मुलगा आहे. शिक्षणाबद्दल त्याला तळमळ आहे. इतरांच्या मदतीला धावून जाणे त्याचा स्थायी स्वभाव आहे. निसर्ग, पशुपक्षी त्याला मनापासून आवडतात. तो चौकसबुद्धीचा नि धाडसीवृत्तीचा आहे. प्रांजळपणा आणि सहकार्याची भूमिका यामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे. आळस, कुसंगती व अंधश्रद्धा यापासून दूर राहतो. कोणत्याही वस्तूची नासाडी करणे त्याला खपत नाही. त्यामुळे ही कादंबरी बालकुमारांचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी आहे.