Skip to product information
-
Media gallery Media gallery
Devichi Saat Rahasye by Devdutt Pattanaik, Savita Damle
Description
Description
आपल्या पूर्वजांनी हे जीवनचक्र चालू राहण्याच्या दृष्टीने जो विचार केला तो आपल्या पुराणकथांमध्ये सामावलेला आहे. शिव, विष्णू, ब्रह्मा, देवी किंवा आदिशक्ती या संकल्पना आणि त्यांची अनेक रूपे यांच्यामागे वेगवेगळे अर्थ आहेत. भाषेच्या पुरेशा ज्ञानाअभावी हे अर्थ जाणून घेण्यात सर्वसामान्य माणसे कमी पडतात आणि केवळ कर्मकांडात अडकतात. आज ज्या अर्थाने आपण धर्माकडे बघतो त्याहून कितीतरी पटींनी व्यापक असलेला हा धर्मविचार नीट समजून घेऊन त्याचा आजच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्न देवदत्त पट्टनायक यांनी केला.या सृष्टीचे जीवनचक्र चालू राहण्याच्या संदर्भात हिंदू पुराणातल्या कहाण्या, चिन्हे आणि प्रतीके, कर्मकांडे या गोष्टी स्त्री-पुरुष नातेसंबंधांविषयी बरेच भाष्य करतात आणि त्याच वेळी सृष्टी आणि मानवजात यांच्या संबंधांविषयीही खूप काही सांगतात. या कथनाचे तात्पर्य शोधणे हा देवदत्त पट्टनायक यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यातूनच त्यांनी ‘शिवाची सात रहस्ये’, ‘विष्णूची सात रहस्ये’, ‘देवीची सात रहस्ये’ ही पुस्तके लिहिली. मूळ इंग्रजीत लिहिलेली ही पुस्तके आता मराठीत उपलब्ध आहेत.स्त्रीच्या लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, काली अशा रूपांबरोबरच देवदत्त पट्टनायक यांनी पाश्चात्त्य पुराणात येणाऱ्या ‘गाया’ या स्त्रीरूपाचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. समृद्धी (लक्ष्मी), ज्ञान (सरस्वती), प्रेम (दुर्गा) आणि शक्ती (काली) अशा स्त्रीमध्ये एकवटलेल्या गुणांचा विचार या पुस्तकात करतानाच एकूणच स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन कसा बदलत गेला आणि मानवी समाजाचा प्रवास मातृसत्ताक पद्धतीकडून पितृसत्ताक दिशेने कसा झाला, स्त्रीवर बंधने का येत गेली याही प्रश्नांचा ऊहापोह पट्टनायक यांनी केला आहे.विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता तर शिव हा संहारकर्ता असे मानले जात असले तरीही शिवाचे संसारी रूप हे अधिक पूज्य का मानले जाते किंवा ब्रह्मा हा सृष्टीनिर्माता असूनही पूजनीय का नाही, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा एकत्रित सहवास का नसतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘देवीची सात रहस्ये’ या पुस्तकात मिळतात.‘परमेश्वर आहे की नाही,’ या वादात न पडता देवदत्त पट्टनायक पुराणात जे सांगितले आहे ते अतिशय सोप्या शब्दांत, अनेक कथा-कहाण्यांची उदाहरणे देत वाचकांपुढे ठेवतात. त्यातून वाचकाला विचारप्रवृत्त करतात. हजारो वर्षांपूर्वी माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, या प्रश्नावर विचार करताना आपल्या पूर्वजांनी जे तत्त्वज्ञान मांडले ते पाहून वाचक त्यापुढे नतमस्तक होतो.
- Regular price
- Rs. 338.00
- Regular price
-
Rs. 375.00 - Sale price
- Rs. 338.00
- Unit price
- / per
-10%
Notified by email when this product becomes available
Devichi Saat Rahasye by Devdutt Pattanaik, Savita Damle