ज्यांना आपण श्रध्दांजली वाहतो, त्या व्यक्ती केवळ सर्वगुणसंपन्न होत्या, असा आदर्श मागे झाला नाही, पुढे होणं शक्य नाही - अशासारखं लिहिणं शक्य आहे; पण मला ही केवळ व्यक्तिपूजा वाटते... कदाचित ऐन तिशीमध्ये मी तसं लिहू शकलो असतो किंवा तशा प्रकारचं लिहिलंही असेल. आता या वयाला केवळ भावप्रचुर लिहिणं मानवत नाही आणि उपयुक्तही वाटत नाही. काहीतरी पूर्णांशानं खरं असलेलं आपण लिहू या, त्यामध्ये कार्याची हानी होणार नाही अशी अवश्य काळजी घेऊ या. पण तरीसुध्दा शक्य तितकं यथातथ्य लिहू या, केवळ भावनाप्रधान लिहायला नको, असं मला वाटतं. - आप्पा पेंडसे (एका पत्रातून)