Skip to product information
1 of 1

Davabindu By V. S. Khandekar

Description

‘...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून तो सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चारदोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामथ्र्य पुष्कळांच्या अंगी नसतं. मीही त्याला अपवाद नाही. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना आणि विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्षं मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहावीस वर्षांत मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृष्टिक्रमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला, तो केवळ वैयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’ From where do these seeds for stories come? They come from all directions. They come from self experience, they come from something heard. Many of the experiences carry these seeds. But not always are they germinated. Why? That is because of the lack of capacity to fertilize a seed. Seed is always fruitful. But the bearer may not be so... I am not an exception to this rule. Sometimes, when a person is sleeping soundly something pricks him intensely. Which awakens the sensations, get engulfed in imagination, feelings and thoughts and takes birth as a story. I have been witnessing this for the past 50 years. During the initial phase of a decade or two I was a slow learner I was trying to walk but was often stumbling. But I had a never ending stream of enthusiasm in me. After these 50 years, that stream is still there with me but the flow is now very weak. This collection of short stories reflects some of my stories which were a reflection of my imagination, thoughts and feelings only if my stories give innocent happiness to some, happiness of reading good literature to some, assurance to some then I will consider myself very lucky.
Regular price
Rs. 110.00
Regular price
Sale price
Rs. 110.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Davabindu By V. S. Khandekar
Davabindu By V. S. Khandekar

Recently viewed product

You may also like