मध्ययुगीन कालखंडात समर्थ श्रीरामदासस्वामींचे साहित्य हे केवळ आध्यातमिक प्रवृतीचे साहित्य नव्हते; तर संपूर्ण सामाजिक, राजकीय व लोकजीवनाला व्यापणारे व त्यांची तात्विक चर्चा करतानाच जनोपदेश व प्रबोधन करणारे होते. श्री समर्थांच्या विपुल साहित्यरचनांपैकी 'दासबोध' हा मराठीतील महत्वाचा ग्रंथ आहे.
मानवी जिवानातील विविध विषयांचा उहापोह करून मार्गदर्शन करणाऱ्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य विविधांगी आहे. समर्थांचा लोकजीवनविषयांचा अभ्यास, निरीक्षणे व त्यांचे तत्वाद्यान हे दासबोधाचे एक वैशिष्ट्य आहे. दासबोधातील लोकतत्वांचा शोध घेऊन त्याची तात्विक अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी प्रस्तुत ग्रंथात केली आहे