सुहास क्षीरसागरखेळ, संगीत, पर्यटन या वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करताना लेखकाने प्रत्यक्ष घेतलेले अनुभव आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात डोळसपणे टिपलेल्या नोंदी, निरनिराळ्या वृत्तपत्रात, मासिकात प्रसिद्ध झालेले लेख याचा धांडोळा; तद्वतच बँकेतील ह्युमन रिसोर्स विभागात प्रदीर्घ काळ कार्यरत असताना कमीत कमी मनुष्य बळाचा कार्यक्षमतेने वापर करण्याचे तंत्र जाणले. त्या वेळी मानवी मनाचा, व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा अभ्यास करताना आलेले मनोज्ञ अनुभव, काही रंजक, काही विचार करावयास भाग पाडणारे.अशा विविध विषयांची एकत्र गुंफलेली ही सुवासिक फुले'दरवळ'च्या रूपाने ओघवत्या शैलीत मांडली गेली आहेत.