योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपडी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.