इन्फोसिसचे मुख्य प्रवर्तक असलेल्या नारायण मूर्ती यांनी 1981 साली अवघ्या 250 डॉलर्सच्या बीजभांडवलावर या कंपनीची उभारणी केली. आज संयुक्त अमेरिकेत नोंदणी मिळविणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी असून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून भागभांडवल मिळविणारी ही पहिली कंपनी आहे. प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटी या भांडवलावर उद्योगविश्वाची निर्मिती करणाऱ्या नारायण मूर्तींची ही चरित्रकथा स्फूर्तिदायक आहे.