मूळ लेखक : विल्यम सॉमरसेट मॉम अनुवाद : सदानंद जोशी
पाशिमात्य साहित्याने श्रेष्ठ लेखक म्हणून सॉमरसेट मॉम विश्वप्रसिद्ध आहेत. कथाकार म्हणून त्यांच्या लेखणीचा प्रभाव समकालीन साहित्यावर होतो. तो आजही आहे. प्रत्येक शब्दा-शब्दातून त्यांची कथा उलगडत जाते आणि वाचकाला चकित करते. नवसाहीत्यातील आधुनिकता आणि सौन्दार्यवाद यांचा समन्वय साधणारी मॉमची कथा, मानवी संवेदना आणि जीवनानुभव यांचे कलात्मक प्रदर्शन करते. कथातील पात्रांची रचना आणि भावना यांचे सामर्थ्य चित्रण करणाऱ्या ह्या कथा वाचकांना केवळ भावुक करत नाहीत तर अंतर्मुख करतात. वैश्विक साहित्यातील ह्या महान कालाकाराच्या कथांचा मराठी अनुवाद वाचकांना नक्की ,आवडेल, त्यांचे वाड्मयीन आकलन आधिक विस्तृत व समृद्ध करतानाच उत्तम साहित्य वाचल्याचा आनंदही त्यांना प्राप्त होईल