मी माझ्या मिसुरीच्या शेतावर अनेक झाडे लावली होती. सुरुवातीला ती खूप भराभरा वाढली. पण मग असा काही वादळाचा तडाखा बसला की प्रत्येक फांदीन्फांदी बर्फाच्या ढिगायाखाली उन्मळून पडली. बर्फाच्या ओझ्याखाली विनम्रपणे वाकण्याऐवजी या झाडांनी आत्मप्रौढी मिरवत वादळाशी संघर्ष केला आणि आत्मनाश ओढवून घेतला. मी स्प्रुस आणि पाअीन वृक्ष कधीही बर्फामुळे उन्मळून पडलेले पाहीले नाहीत. या सदाहरीत जंगलांना वाकायचे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घ्यायचे माहीती आहे. जर आपण आयुष्यातील वाईट प्रसंगांना विरोध केला, त्यांच्याशी जुळवून घेतले नाही तर काय होईल? आपण विलो वृक्षाप्रमाणे वाकण्यास नकार दिला आणि ओक वृक्षाप्रमाणे ताठर भूमिका स्विकारली तर काय होईल? आपल्या अंतर्मनातील संघर्ष वाढेल आपण चिंताक्रांत, गंभीर, तणावपूर्ण व वैफल्यग्रस्त होऊ.