मनुष्याच्या लौकिक, तसंच शारीरिक आणि मानसिक आयुष्यात सतत स्थित्यंतरं घडत असतात. त्या स्थित्यंतरांत माणसाची मानसिक मोडतोड होत असते आणि त्याच मोडतोडीतून माणूस पुन्हा पुन्हा उठत असतो... आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतो... ‘चिकन सूप’च्या या कथा म्हणजे माणसांतल्या विलक्षण ताकदीच्या कथा आहेत. मानवी स्वभावातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कंगोयांवर ऊहापोह करणाया या कथा, म्हणजे अनेकांच्या अंधाया मार्गावरच्या, रस्ता दाखवणाया ज्योती आहेत!