Skip to product information
-
Media gallery Media gallery -
Media gallery Media gallery
Chari Dham Yatra (हिमालयातील चार धाम यात्रा ) by Dr S G Mahajan
Description
Description
डॉ. शां. ग. महाजनहिमालय ही देवभूमी आहे. तेथे जाऊन यमुनामैयाचं दर्शन घ्यावं, गंगेत स्नान करून पुण्य मिळवावं, केदारनाथी महादेवाचा आशीर्वाद घ्यावा, त्रियुगीनारायण येथे जगन्माता पार्वतीला वंदन करावं, बदरीनाथधामी लक्ष्मी नारायणाचे चरण धरावे आणि हरिद्वार येथे गंगामैयाची आरती करून द्रोणात दीप सोडावा ही मनाकामना पूर्ण करण्यासाठी हजारो भारतीय चारी धाम यात्रा पुरी करतात.लेखकानेपण ही यात्रा पुरी केली.या यात्रा वर्णनात हिमालयातील कांचनमय हिमशिखरे, मनोहारी धबधबे, घनदाट वनश्री आणि सृष्टीनं पांघरलेलं अनंत अलंकार या निसर्ग सौंदर्याचं वर्णन पानोपानी आढळेल. तसेच यात्रेमधील तीर्थक्षेत्रे, ठिकाणे, देवदेवतांची मंदीरे, त्यांचा इतिहास, परंपरा, महत्व सांगितले आहे.प्रवासामध्ये लेखकाचं विचारचक्र सुरू झालं. तीर्थयात्रा म्हणजे काय? त्या का करायच्या? त्यामुळे कोणते पुण्य मिळतं? तीर्थयात्रा आणि पिकनिक यामधील फरक काय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय नामस्मरणाचं महत्व, संकटकाळी देव का आठवतो, जीवनात सद्गुरूचं महत्व, यात्रा कंपन्यांचं पुण्यकर्म, यात्रेचा जीवन यात्रेशी संबंध अशा अनेक विषयांवर चिंतन केलं आहे. ते वाचकांना अंतर्मुख करायला लावील.असं मानवाच्या जीवन यात्रेविषयी चिंतन करायला लावणारं पुस्तक प्रत्येक घरात आणि ग्रंथालयाच्या संग्रही हवचं.
- Regular price
- Rs. 100.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 100.00
- Unit price
- / per
-0%
Notified by email when this product becomes available
Chari Dham Yatra (हिमालयातील चार धाम यात्रा ) by Dr S G Mahajan
Rs. 100.00