Skip to product information
1 of 1

Chandrashekhar By Madhuri Shanbaug

Description

भारतात जन्मलेल्या आणि इंग्लंड-अमेरिकेत कर्तृत्व गाजवलेल्या एका नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाचे - डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे - हे चरित्र आहे. भारतातल्या प्रारंभिक शिक्षणापासून अमेरिकेतल्या प्रगत संशोधनापर्यंत त्यांचा जीवनप्रवाह कसा वाहत गेला, त्याने कोणकोणती वळणे घेतली, याचा हा वेधक वृत्तांत आहे. \'श्वेतबटू\' किंवा \'कृष्णविवर\' यांच्यासारख्या क्लिष्ट, अगम्य वाटणा-या विषयांमध्ये त्यांनी केलेले संशोधन, त्या संशोधनाला खूप विलंबाने मिळालेली मान्यता आणि त्या विलंबामुळे निराश न होता त्यांनी प्राध्यापकीपासून ग्रंथलेखनापर्यंत विविध क्षेत्रांत केलेले मौलिक कार्य, मायदेशी परतण्याऐवजी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, शेक्सपीयर- बिथोव्हन-न्यूटन या दिग्गजांच्या सृजनशीलतेची वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी केलेली आस्वादक चिकित्सा... हे सारे आणि आणि आणखी बरेच काही सांगणारे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकालाही समजेल अशा सरळसाध्या भाषेत लिहिलेले असले, तरी त्याचे वैज्ञानिक कुतूहल जागे करण्याचे सामर्थ्य त्यात दडलेले आहे. डॉ. चंद्रशेखर यांच्या बहुमुखी, बहुआयामी प्रतिभेचा प्रत्ययकारी परिचय करून देणारे हे पुस्तक मराठीमधील चरित्रग्रंथांमध्ये मौलिक भर घालणारे ठरेल, हे निश्चित. 
Regular price
Rs. 175.00
Regular price
Sale price
Rs. 175.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Chandrashekhar by Madhuri Shanbaug
Chandrashekhar By Madhuri Shanbaug

Recently viewed product

You may also like