जग आपलेच आहे आणि पृथ्वीवर आपलाच आधिकार आहे. असा समज माणसाने करून घेतला . विज्ञानामुळे आपण सर्वज्ञ झालो आहोत आणि निसर्गाला टक्कर देऊ शकतो असा मद त्याला झाला. त्याचा परिणाम म्हणून निसर्गाने उलट थप्पड मारली. अतिसूक्ष्म व्हायरसने आपण प्राण्यासारखे कैद झालो. निसर्गाच्या पुढे सगळे प्राणी सारखे हे लक्षात ठेवून एकदा मिळालेले आयुष्य उत्तम पद्धतीने कसं कसे जगायचे हे ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.