अनासक्ती, अफाट व्यासंग, चाणाक्ष बुद्धिमत्ता, धोरणी राजकारण, इतक्या सर्व सद्गुणांचा समुच्चय एका चाणक्य नावाच्या व्यक्तीत झाला आहे. धूर्त व यशस्वी राजकारणी असून देखील चाणक्याला राजपदाचा मोह नव्हता. राजसत्तेच्या वैभवाला निर्मोही वैराग्याची जोड असणे, हा आदर्श आर्य संस्कृतीचा विचार चाणक्यामुळे दृढ झाला. वर्तमान जगताला आजदेखील या परंपरेची नितांत आवश्यकता भासते आहे, हे अमान्य करून चालणार नाही. सामान्यत: फारसा परिचित नसलेला हा एका महानायकाचा इतिहास कथास्वरूपात या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.