मोठमोठ्या मेजवान्या देणारा उधळपट्ट्या यजमान अशीच श्री. शैताना यांची ख्याती होती. असं जरी असलं तरी प्रत्येकजण त्यांना थोडं वचकूनच असायचा. ‘खून करणं हा एक कलाप्रकारच असल्याचं आपण मानतो,’ असं त्यांनी एकदा फुशारकीनं पायरोजवळ बोलून दाखवलं होतं. म्हणूनच जेव्हा त्यांनी आपला वस्तुसंग्रह पाहण्यासाठी आणि मेजवानीसाठी पायरोला निमंत्रण दिलं तेव्हा त्यानं संशयानंच त्या निमंत्रणाकडे पाहिलं. पत्त्यांच्या खेळात बुडालेल्या संध्याकाळचं रूपांतर एका जीवघेण्या खेळात झालं.
‘अगाथा ख्रिस्ती यांच्या संपूर्ण लेखनातली सर्वांत श्रेष्ठ खूनकथा. ही कथा त्यांची सर्वोत्तम चमकदार कामगिरी आहे.’
डेली मेल
‘प्रौढ कुमारिकांसाठी गुप्तहेर हा काही योग्य वर नव्हे. ही कथा वाचून प्रभावित न होणं कठीणच आहे.’
- टाईम्स लिटररी सप्लिमेंट