कॅनव्हास हा अरुण बर्वे यांचा नवा कथासंग्रह. या कथासंग्रहातील कथा ह्या एकाच सूत्रात गुंफलेल्या नसून त्या विविधांगी आहेत. वैविध्यता हे या कथांचे वैशिष्ट्य असून तंत्र आणि शैलीच्या अंगानेही त्या अधिक नाविन्यपूर्ण वाटतात. एकूणच मानवी स्वभावाचे अंतरंग उलगडत जाणार्या या कथा वाचकाची शेवटपर्यंत उत्कंठता व उत्सुकता वाढवित राहतात; आणि म्हणूनच बर्वे यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटतात.