'ही आहे एक धमाल कहाणी. ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव, धर्म, संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो. उत्तर आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर अन् प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा ही त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन अन् विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात मुरवणार आहोत का? गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी हसत-हसवत, गुदगुल्या करत वाचकांना विचारप्रवण करणारी कांदबरी '