Skip to product information
1 of 1

Business Legends By Geeta Piramal

Description

जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच ‘आख्ययिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन – त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, लेखिकेनं त्यांची पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत – प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे ‘संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामथ्र्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या – देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे, हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्त्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल. . G. D. Birla, Walchand Hirachand Doshi, Kasturbhai Lalbhai and J. R. D. Tata are the living legends of India. Their lives are full of controversies; yet they have used every opportunity skillfully to prove their capability. This book presents the biographies of these legends. It includes their personal lives, their habits, the ups and downs in their lives, their life-styles, their thinking, their ability of precision decision making, the tensions building all around, the basic foundation of determination and persistence, their struggle during the unfavourable British regime, their strength to convert problems into chances, their vision which took them beyond their families, their patriotism, their immense efforts to make their nation financially strong, all these and several other related aspects are described here. The peculiar thing about this book is the author has succeeded in presenting them on the wide canvas with the background of the tense political, social and financial situations. The author has undergone a lot of pain to gain information from the sources which were never tried before. These biographies will surely boost the innovative and would be industrialist minds to set up their universe.
Regular price
Rs. 495.00
Regular price
Sale price
Rs. 495.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Business Legends By Geeta Piramal
Business Legends By Geeta Piramal

Recently viewed product

You may also like