प्रखर इच्छा आणि मानसिक ऊर्जा यांच्या साहाय्याने आयुष्यात अपेक्षित चांगला बदल व तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. ध्यानसाधनेच्या माध्यमातून जीवनात लक्षणीय बदल करणे शक्य होते. आपले मन, शरीर आणि आपली परिस्थिती, यात काही चांगले बदल घडवून आणण्यासाठी ध्यानधारणेची कौशल्ये कशी आत्मसात करावी याबद्दल प्रस्तुत पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी अगोदर मज्जासंस्थेसंबंधित आणि आण्विक भौतिक शास्त्राविषयी मूलभूत तसेच माहितीपूर्ण विवेचन या पुस्तकात केले आहे. संकुचित मनोवृत्ती आणि वाईट सवयींपासून मुक्त होऊन आपल्या ध्येयानुसार स्वत:चे नवीन आयुष्य घडवण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे!