मानवी जीवनातील गूढता, अनाकलनीयता आणि अस्तित्वाचा प्रश्न या सगळ्यांचा शोध घेणे हे मनोहर शहाणे यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे.
मानवी जीवनातील परस्परसंबंध, आसक्ती, त्यांच्या बर्या-वाईट प्रवृत्ती, मृत्यूची अटळ सावली हे शहाणे यांच्या लेखनातून दिसते.‘ब्रह्मडोह’मधील कथा शहाणे यांच्या सगळ्या लेखनवैशिष्ट्यांसह आल्या आहेत. ‘ब्रह्मडोह’मधील कथा सर्वसाधारण माणसाच्या कथा आहेत. कधी त्या मनाला हुरहुर लावतात, कधी अस्वस्थ करतात. कधी त्या आपल्या भोवतालच्या वाटतात. चांगल्या कथा ह्यापेक्षा अधिक काय असू शकतात?