Skip to product information
1 of 1

Brahmakanya By Zoya Phan , Demian Luis

Description

"झोया फन हे निसर्गाचे लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिचे बालपण व्यतीत झाले. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली तर बाबा करेन प्रतिकार चळवळीतील नेते. पण झोया आणि तिच्या भावा-बहिणींना बर्मी जुंत्याने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची जराही कल्पना नाही. मे यु क्लो नदीच्या काठावर वसलेल्या पेर हे लू गावात त्यांचे निरागस, अवखळ बालपण पुÂलांच्या बागेत खेळण्यात, पुÂलपाखरांमागे धावण्यात, आंब्याच्या झाडांवर चढण्यात, आंबे फस्त करण्यात झरझर सरते आहे. पण एके दिवशी त्यांच्या या सुंदर स्वप्नांना कोणाची तरी दृष्ट लागावी तसे होते. वयाच्या चौदाव्या वर्षी झोयाचे बालपण अचानकच संपून जाते. तिच्या गावावर बर्मी सैनिक हल्ला करतात आणि जीव वाचवण्यासाठी झोयाला आणि तिच्या कुटुंबीयांना पळ काढावा लागतो. आगीच्या ज्वाळांनी वेढलेले आपले घर डोळ्यांत साठवून त्याकडे पाठ फिरवल्यानंतर त्यांच्या भाळी लिहिलेली असते ती जंगलांमधून अर्धपोटी केलेली वणवण आणि सदैव पाठलागावर असणाNया बर्मी सैन्याची भीती. घरादाराला पारखे झालेल्या हजारो करेन लोकांसारखेच हे कुटुंबदेखील जंगलाचा आसरा घेत लपतछपत थायलंडमधील एका सैनिकी छावणीत आसरा घेते. जन्मजात हुशार झोया शिष्यवृत्ती मिळवून थायलंडमध्ये आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये शिक्षणाकरिता प्रवास करते आणि तिथे आश्रयासाठी अर्ज करते. पुढच्याच वर्षी प्रÂी बर्मा मोर्चाच्या गर्दीतून तिलाच निवडून बोलण्याकरिता उभे केले जाते, त्यानिमित्ताने ती तिच्या आयुष्यातील पहिलीवहिली मुलाखत थेट बीबीसीवर देते आणि बघताबघता ती बर्माच्या स्वातंत्र्यलढ्याचा आंतरराष्ट्रीय आवाज बनते. त्यानिमित्ताने झोया अनेक मुरब्बी राजकारण्यांच्या भेटीगाठी घेते, अभिनेत्यांना सोबतीला घेऊन, व्यासपीठावरून मदतीचे आवाहन करते. पण तिच्या प्रत्येक हालचालीवर बर्मी जुंत्याचे लक्ष आहे. तिच्या प्रयत्नांनी तिला प्रसिद्ध तर केले आहेच पण तिच्या जिवाला आता कायम धोका असणार आहे. झोयाला तिच्या मायदेशी परतायला मिळाले का? मिळेल का? " Zoya Phan was born in the remote jungles of Burma, to the Karen ethnic group. For decades the Karen have been under attack from Burma`s military junta; Zoya`s mother was a guerrilla soldier, her father a freedom activist. She lived in a bamboo hut on stilts by the Moei River; she hunted for edible fungi with her much-loved adopted brother, Say Say. Many Karen are Christian or Buddhist, but Zoya`s parents were animist, venerating the spirits of forest, river and moon. Her early years were blissfully removed from the war. At the age of fourteen, however, Zoya`s childhood was shattered as the Burmese army attacked. With their house in flames, Zoya and her family fled. So began two terrible years of running from guns, as Zoya joined thousands of refugees hiding in the jungle. Her family scattered, Zoya sought sanctuary across the border in a Thai refugee camp. Conditions in the camp were difficult, and Zoya now had to care for her ailing mother. Zoya, a gifted pupil, was eventually able to escape, first to Bangkok and then, with her enemies still pursuing her, in 2004 she fled to the UK and claimed asylum. The following year, at a `free Burma` march, she was plucked from the crowd to appear on the BBC, the first of countless interviews with the world`s media. She became the face of a nation enslaved, rubbing shoulders with presidents and film stars. By turns uplifting, tragic and entirely gripping, this is the extraordinary true story of the girl from the jungle who became an icon of a suffering land.
Regular price
Rs. 350.00
Regular price
Sale price
Rs. 350.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Brahmakanya By Zoya Phan , Demian Luis
Brahmakanya By Zoya Phan , Demian Luis

Recently viewed product

You may also like