मैत्रेयीने मानेने ‘हो-हो’ आणि ‘नाही-नाही’ केलं की
आजी म्हणायची, “बोलता येत नाही का तुला?”
आणि बोललं की म्हणायची,
“मैत्रेयी, इतकी बडबड करून तुझा घसा कसा दुखत नाही?”
म्हणजे आवाज न करता बोललं तरी
मानेचाच वापर करावा लागतो आणि
आवाज करून बोलायला तर
त्याच मानेत असलेलं स्वरयंत्र आवश्यक असतं.
मैत्रेयीला प्रश्न पडला की, मानेचा अजून कोणता उपयोग असतो?
मान नसती तर आपलं डोकं
साप, बेडूक किंवा वा माशाच्या डोक्यासारखं दिसलं असतं.
मान तर हवीच. मान नसेल तर आजी पोहेहार कुठे घालणार?
पण मग मान, कंठ, घसा असे वेगवेगळे शब्द का वापरतात लोक?