भारतीय जनमानसात बिरबलाला वेगळे स्थान आहे, ते त्याच्या चातुर्यामुळे. बिरबलाच्या ह्या चातुर्यकथा आज घरोघर पोहोचल्या आहेत. बिरबल ही एक केवळ ऐतिहासिक व्यक्ती न राहता, त्याच्या चातुर्यकथामुळे त्याला चिरंजीवत्व प्राप्त झाले आहे. बिरबलाला लोकभावनेने जे व्यापक स्वरूप दिले आहे, त्यातून त्याची एक लोकप्रतिमा निर्माण झाली आहे. ही प्रतिमा ह्या पुस्तकातील प्रत्येक कथेतून स्पष्ट होत आहे. बिरबलाचे व अकबराचे स्वतंत्र व वेगळे व्यक्तिमत्त्व सांभाळत, विनोद, हजरजबाबीपणा व चातुर्य यांचा सुरेख संगम करून, आजच्या आजूबाजूच्या घटनांवर मिष्किल पण अर्थपूर्ण हास्यझोत टाकला आहे. तंबी दुराई यांचे हेच वैशिष्ट्य आहे. केवळ मुलेच नव्हे तर सर्व वयोगटातील वाचक ह्याचा आनंद घेतील.