पण याचा अर्थ कराळेसारख्या माणसाने, ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही, ज्याचं आमच्याशी काही वैर नाही, अशा माणसाने एवढा सूड उगवावा. केवळ साहित्याच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी म्हणून माझ्याकडे पाहावं. मला त्रास द्यावा. आम्हाला जीवनातून उठवावं. असे झारीतील शुक्राचार्य वेळीच ठेचून काढायला हवेत. मी करेल हे. योग्य वेळ येताच, मी करेल हे.