Skip to product information
1 of 1

Bhavkallol By K. Satyanarayana

Description

के. सत्यनारायण यांच्या कथांतील पात्रे, प्रसंग, घटना, निसर्ग, ग्रामीण व निमनागरी जीवनसरणी ही मंड्या, बंगळुरू व आसपासची गावे यामध्ये बंदिस्त झालेली आहे. त्यात चित्रित झालेली कुटुंबव्यवस्था आणि त्यात मुरलेले र्धािमक व पारंपरिक संस्कार हे अस्सल कर्नाटकी आहेत. त्यामुळे या कथांचे स्वरूप कौटुंबिक कथा असेच आहे. काही कथांतून आधुनिक जीवनाचे कवडसे उमटलेले दिसतात. काही परदेशी पाहुणे अचानक उतरून वावरताना दिसतात; पण हे अपवादात्मक आणि कथासंग्रहाच्या मूळ वस्तूला ढळ न पोहचेल या रीतीने! त्यांच्या कथांची निवेदनशैली प्रवाही आहे, ती भरगच्च तपशिलाने सजलेली आहे. काही कथांतील पात्रांचे वागणे आणि त्यांची अभिव्यक्ती अतिशयोक्त वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्या कथांतून प्रादेशिकतेचे वातावरण सतत जाणवत राहते आणि ते साहजिकही आहे. त्याच्या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात वर्णन केलेले कौटुंबिक वातावरण. कुटुंबात एकत्र राहणारी मुलेबाळे, कुटुंबात झडणारे समारंभ, रीतिरिवाजांचे पालन, संसारात रमलेली मुलेबाळे, त्यांच्या येणाऱ्या वार्ता, त्यामुळे आठवणारे पुराणातले समांतर प्रसंग आणि घटना यांचा संभार या कथांतून दिसून येतो.  These 15 Kannada stories of K. Satyanarayana, an Important Writer of New Generation, covers a wide spectrum of contemporary experience ranging from intensely personal topics like Death & Love to Polemics on significant political and social questions of our times. In doing this, the stories overcome urban- rural, modern traditional divide by adopting an openminded approach to issues and people. In his narration, Satyanarayana combines and deftly uses different modes of narration by using elements of oral Tradition, Modernist narration and Surrealist representation. These stories written in last two decades – a disturbing phase in our National life – have been sensitively translated by Professor N.I. Kadlaskar.
Regular price
Rs. 120.00
Regular price
Sale price
Rs. 120.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Bhavkallol By K. Satyanarayana
Bhavkallol By K. Satyanarayana

Recently viewed product

You may also like