शं. रा. देवळे लिखित ‘भारतातील महान राजे’ या पुस्तकात भारतीय इतिहासात आपला अमूल्य ठसा उमटवणारे थोर राजे व त्यांच्या महान पराक्रमांविषयीची गाथा प्रेरित करणारी आहे. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महाराणा प्रताप, बादशहा अकबर, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या शूर-वीर व उदात्त मनाच्या राजांनी केवळ जनतेवरच नाही, तर त्यांच्या मनावर राज्य केले. म्हणून त्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. अशा या अजरामर विभूतींचे कार्य वाचताना त्यांनी रचलेला दिव्य इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. इतिहास घडवायचा असेल तर इतिहास माहिती असावा लागतो. हे पुस्तक शौर्यगाथा व अलौकिक साहस याला समर्पित असून उत्स्फूर्त व अनुकरणीय आहे. सहज, सोप्या व रंजक स्वरूपात लिहिलेल्या या पुस्तकाचा पुस्तकप्रवास सर्व वाचकवर्गाची उत्सुकता टिकवि णारा व ज्ञानात भर घालणारा आहे.