अशक्य ते शक्य करून दाखवणे आणि पुरुषांची चेतनाशक्तीही सतत जागृत ठेवले ही स्त्रीला निसर्गानेच दिलेली बहुमोल देणगी आहे. त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे हे कोणत्याही स्त्रीला कधी शिकवावे लागत नाही मग ती अगदी निरक्षर वा अडाणी असली तरीही! उपजत मिळालेल्या या दानाने स्त्री मुळातच समृद्ध आणि सबला आहे.याच देणगीचा वापर करून काही स्त्रियानी समाजाचा व देशाचा उद्धार केला आणि ‘सौदर्य’ हेच स्त्रीचे सामर्थ्य नाही आणि कर्तृत्व ही केवळ पुरुषांची मत्तेदारी नाही हे सप्रमाण सिद्ध केले.अशाच तेजस्विनींच्या आयुष्याचा मागोवा घेणे म्हणजेच आपल्यातील सुप्त संजीवनी शक्तीला पुनर्जागृत करणे.