'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा तिसरा भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वासाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या तिसऱ्या भागात तुम्ही वाचणार आहात : • माहिती-तंत्रज्ञान • साहित्य-संस्कृती-कला • अर्थ-उद्योग-व्यापार • शेती-पाणी • पर्यावरण-हवामान • निवडणुकांचे वृत्तांकन • विकास पत्रकारिता कशी करायची • पत्रकारितेतील नीतिमूल्यांबाबतचे परखड विवेचन '