आपल्या राष्ट्राची मानहानी का झाली, त्या मानहानीला कोण कोण जबाबदार आहेत हे जाणून घ्यायचा लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. त्यानुसार सरकारने लोकांपुढे आपला जाब दिलाच पाहिजे. परंतु जेव्हा सरकार तसे करायला नकार देते, तेव्हा कोणी तरी ही जबाबदारी उचलावीच लागते. १९६२ च्या ऑक्टोबरमध्ये आपल्या उत्तर सीमेवर ज्या घटना घडल्या त्यांची पार्श्र्वभूमी आणि आपल्या या राष्ट्रीय मानहानीला जबाबदार असलेले घटक यांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडविणे हेच प्रस्तुत पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.