Skip to product information
1 of 1

Bari By Ranjeet Desai

Description

जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे. The` Barre` tribe had traditionally lived in thick and beautiful jungles. They resorted to dacoit and theft in nearby localities for their living. They hardly ever dreamt of stable life. The socio-political changes around and falling of forests significantly changed their life style and introduced them to new ways and values. `Bare’ recounts all this in form of a novel. The picturesque environs, the rugged life-style, the petty feuds and pleasures, the new changes etc. have been powerfully and realistically presented without any attempt to pass any value judgments.
Regular price
Rs. 250.00
Regular price
Sale price
Rs. 250.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Bari By Ranjeet Desai
Bari By Ranjeet Desai

Recently viewed product

You may also like