'स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची '