'अवतीभवती' या कथासंग्रहात माधव पिटके यांनी भोवतालच्या व्यक्ती, घटना यांचे निरीक्षण करून त्यांना शब्दरूप दिले व ह्या कथा अवतरल्या आहेत. लेखक कथेतील पात्रांच्या भावविश्वात सहजपणे प्रवेश करतो. या सर्व कथांत भिन्नभिन्न मानवी स्वभावाचे अस्सल नमुने पेश झालेले आहेत. लेखकाचा मानवी जीवनातील चांगुलपणावर असलेला विश्वास आणि श्रद्धा यांचे पदोपदी दर्शन घडते.