सतत सानिध्यात असूनही परके वाटणारे आपल्या शरीराचे अवयव या पुस्तकात स्वत: स्वत:ची माहिती करून देत आहेत अशी कल्पना करून अतिशय रंजकपणे ती मांडली आहे. आपल्या शरीरातील हे सगळे अवयव कोठे आहेत, ते कसे काम करतात, ताणतणावांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो याची सखोल ओळख करून दिली आहे.