Skip to product information
1 of 1

Avachit Ase Kahee by Balchandra Ukhalkar

Description

वेगाने धावणार्‍या या जगाचा हात धरून तितक्याच वेगाने वाढणारे यांत्रिकीकरण... या दोन्हींशी होणार्‍या स्पर्धेच्या दबावामुळे जगण्यातून आरपार विस्कटलेला माणूस... आयुष्याच्या चराचरातून आटत चाललेले माणूसपणाचे स्रोत... धूसर झालेला माणसा-माणसांमधील संवाद...  या सगळ्यामध्ये वावरताना बालचंद्र उखळकरांना ऐकू येणार्‍या त्यांच्याच संवेदनशील मनाच्या खोल कप्प्यांमधून उमटणार्‍या स्पंदनांच्या हाका... त्याच मनाभोवती रेंगाळणारी, आपापल्या जगण्याचे अनुभव घेऊन आलेली विभिन्न थरांतील माणसं... - आणि एका अवचित क्षणी जन्माला येणारे कथाबीज. आपले रोजचे आयुष्य जगताना निकोप, निराकार आणि निरामय वृत्तीने घेतलेल्या अनुभवांना कथारूप देण्याची बालचंद्र उखळकरांची प्रामाणिक पण टोकदार शैली त्यांच्या चिंतन प्रगल्भतेची जाणीव करून देणारी तर आहेच, शिवाय स्वत.चा वेगळा आणि निगर्वी आत्मस्वर प्रकट करणारीही आहे.
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Avachit Ase Kahee by Balchandra Ukhalkar
Avachit Ase Kahee by Balchandra Ukhalkar

Recently viewed product

You may also like