Skip to product information
1 of 1

Atmavishwas Vadhva Sarvakahi Milva by Swett Marden

Description

जीवनात यश मिळवण्यासाठी निर्भयता अत्यंत आवश्यक आहे. भीतीमुळे माणसातील सर्जनात्मक शक्ती नष्ट होते, त्याचे प्रयत्न कमी पडतात आणि आशा-आकांक्षा धुळीस मिळतात. भीती हा माणसाचा मुख्य शत्रू आहे. मनात पाळलेली भीती हा एक शाप आहे. आपण आपल्या आयुष्यात अपयश, निर्धनता, अस्वीकार इत्यादी गोष्टींना खूप जास्त घाबरतो. या गोष्टी आपल्या वाट्याला कधीच येऊ नयेत, या भीतीपोटी आपण प्रयत्नशील राहतो; पण म्हणतात ना, ‘भित्या पाठी ब्रह्मराक्षस.’आपण ज्याला घाबरतो त्यालाच बळ देतो आणि नको असणार्या गोष्टी स्वत:कडे ओढून घेतो. भीतीमुळे अनेक विकारही आपल्याला जडतात तसेच चिंता, निराशा, अकार्यक्षमता, संशय आणि आत्मविश्वासाची कमतरता आपल्यात निर्माण होते. अशा या ब्रह्मराक्षसरूपी विविध भीतींना न घाबरता आपले अस्तित्व टिकवणे, ही आज काळाजी गरज बनली आहे. या भीती कोणकोणत्या असतात, त्या कशा आणि का निर्माण होतात, त्यावर काय उपाय करायला हवेत, याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात करण्यात हवेत, याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. सोबतच लहान आणि त्यांची भीती याविषयीदेखील सांगण्यात आले आहे.ज्या व्यक्तीमध्ये उत्साह आणि निर्भयता आहे, त्याला नक्कीच यशप्राप्ती होते. त्यामुळे भयाकडून निर्भयतेकडे नेणारे, तसेच निर्भय बनून उत्साहाने जगण्यास प्रेरणा देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Atmavishwas Vadhva Sarvakahi Milva by Swett Marden
Atmavishwas Vadhva Sarvakahi Milva by Swett Marden

Recently viewed product

You may also like