Skip to product information
1 of 1

Athvani Ajobanche By Arun Shevte

Description

काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं.आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजोबांच्या आठवणीचं । आजोबा म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं विसंबून राहण्याचं हक्काचं ठिकाण! आजोबांचे अनुभवाचे चार बोल, त्यांची पाठीवर पडलेली थाप आत्मविश्वास देत असते. आजोबांच्या आठवणींचे पदर उलगडत आहेत… विश्वास पाटील, विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, सुनील मेहता, उदय निरगुडकर, लक्ष्मण खेडकर ।
Regular price
Rs. 120.00
Regular price
Sale price
Rs. 120.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Athvani Ajobanche By Arun Shevte
Athvani Ajobanche By Arun Shevte

Recently viewed product

You may also like