Skip to product information
1 of 1

Ashram Shala आश्रमशाळा By Anil Sable

Publication: Rohan Publication

Description

गावातला एक साधासुधा कविमनाचा, संवेदनशील माणूस… असा माणूस जो आश्रमशाळेतल्या लहानग्या पोरांवर, आजूबाजूच्या झाडा-पानांवर, रानातल्या पाखरांवर, पुस्तकांवर नितांत प्रेम करतो… असा माणूस ज्याला भोवतालचे स्वार्थी व्यवहार, आदिवासी मुलांच्या शोषणाचं वास्तव टोचत राहतं, सलत राहतं मनाच्या आरपार… जो खरंतर शिक्षक व्हायचं स्वप्न बघतोय. पण पात्रता असतानाही फक्त कुटुंब चालावं म्हणून एका कोपऱ्यातल्या आश्रमशाळेत स्वयंपाक्याची नोकरी करतोय… तो नायक बनू पाहत नाहीये; तो व्यवस्था उखडून टाकण्याची स्वप्न बघणारा कोणी स्वप्नाळू तरुणही नाहीये, तर आपल्या मर्यादांमध्ये राहून पाय घट्ट रोवून उभा राहणारा एक अस्वस्थ माणूस आहे, जो वेळ आल्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कचरत नाही. या कादंबरीत शासकीय आश्रमशाळा आणि त्यातला सावळा गोंधळ, स्वार्थी म्हणावेत असे शिक्षक आणि कर्मचारी आहेत. खालपासून वरपर्यंत ओरबाडून खाणाऱ्या या व्यवस्थेत तग धरू पाहणारी काही जिवंत मनंही आहेत. जीव तोडून शिकण्याचा प्रयत्न करणारी मुलं आहेत. शाळा आणि मल्हारसारख्या माणसांना जपावं असं वाटणारी गावातली काही भली माणसं आहेत. व्यवस्थेने नाकारलेलं शिक्षणाचं स्वप्न काळोख्या अंधाराला कापत उमलत्या मुलांपर्यंत पोहोचवू बघणारी… आश्रमशाळा !
Regular price
Rs. 370.00
Regular price
Rs. 10,000.00
Sale price
Rs. 370.00
-96%
Ashram Shala आश्रमशाळा By Anil Sable
Ashram Shala आश्रमशाळा By Anil Sable

Rs. 370.00

Recently viewed product

You may also like