गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे? फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे? व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का? मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का? कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा? दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते? स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स' वापरायचे की `लोन फड्स'? ...या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.