डॉ. ह. वि. सरदेसाईआपला आहार, आपले व्यायाम, आपल्या मनाची प्रसन्नता ठेवणे आणि टिकवणे एवढे पुरेसे आहे. स्वच्छता हा आरोग्याचा आत्मा आहे. स्वतःचे शरीर, स्वतःचे निवासस्थान आणि स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची आद्यकर्तव्ये आहेत. आपल्या शरीराचे व शरीरक्रियांचे निरीक्षण ही आरोग्य कमावण्याची पहिली पायरी असते. मोठ्या व गंभीर आजारांची सुरुवात तुलनेने सौम्य त्रासांपासूनच होते. या बदलांची वेळीच नोंद घेतली तर मोठे आजार होण्याआधीच या आजारांना रोखणे सुलभ आणि म्हणून सुखद होते. ह्या 'आरोग्याच्या वाटा' सर्वांना उपयुक्त वाटो.