भारताने मंगळावर यान पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी केली. या ऐतिहासिक घटनेची नोंद समस्त जगाने घेतली आहे. अंतराळातील घटना, आश्चर्य यांचे कुतूहल मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देत असते. अंतराळ हा घटक पूर्वीपासूनच मानवी मनाचा एक अकल्पित गाभा आहे. प्रत्येकजण अंतराळात फेरफटका मारण्याचा विचार करत असतो आणि अंतराळाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो.अंतराळातील अशाच काही रंजक व ज्ञानवर्धक विविध घटना व यानांच्या कार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. विज्ञानप्रेमी वाचकांसाठी या पुस्तकातील कथांचा आस्वाद जणू एक पर्वणीच आहे.