झाडे, प्राणी, वस्तू काहीही असो त्यांच्याशी संवाद साधायचा एक निरागस भाव मुलांमध्ये असतो. ती बोलणे शिकतात, तेव्हा प्रत्येक आनंद वा क्षणिक वेदना देणाऱ्या कुणाशीही ती बोलतात. त्यांना आपले सवंगडी मानतात. यातूनच त्यांची इतरांशी नाती जोडायची, त्यातून आनंद घ्यायची कला नकळत विकसित होते.अन्नीला असे अनेक सवंगडी मिळालेले आहेत. त्या निरागस मैत्रीच्या या छोट्या छोट्या गोष्टी.