अण्णा भाऊ साठे... गरीब, दलित, शोषित, या सर्वांच्या वेदनेचा उद्गार अन् पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुंकार... आयुष्यभर काटे-निखारे तुडवत वंचितांच्या जागृतीची मशाल चेतवणारे खंदे लेखक... मायमराठीसाठी डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राची रणलावणी गात दिल्लीपर्यंत धडक मारणारे शाहीर... डॉ. होमी भाभा, नर्गिस, बलराज सहानी, शैलेंद्र, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे अशा राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे कलावंत... अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाच्या दशदिशा धुंडाळून, दुर्मीळ कागदपत्रं शोधून, अण्णांचं जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा खास शोध घेऊन; कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेली वाङ्मयीन चरित्रगाथा अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान