मेंढपाळाच्या एका मोठ्या कबिल्यातल्या छोट्या मिगेलची ही गोष्ट आहे. लवकरात लवकर मोठा होण्याची घाई झालेल्या या मिगेलच्या तोंडून- मेंढपाळाच जीवन, हजारो मेंढ्यांच्या कळपाचे पालनपोषण, तिथली हिरवीगार कुरणे, खळखळणारे झरे, आसपासचा निसर्ग- हे सर्व ऐकताना वाचक त्याच्या भावविश्वात विरघळून जातो.
मागच्या शतकातल्या अमेरिकेतील ही कथा लेखक जोसेफ क्रमगोल्ड यांनी जितक्या सहजतेने सांगितली आहे, तितक्याच सहजतेने प्रतिभावान लेखक/कवी रॉय किणीकर यांनी अनुवादित केली आहे. स्वतंत्र कलाकृतीच्या पातळीवर जाणारा हा अनुवाद, वाचकांना पानोपानी प्रसन्न अनुभव देईल: मनात दीर्घकाळ रेंगाळत राहील.