द टाइम क्विन्टेट मालिकेतील हे चौथं पुस्तक. मरी कुटुंबातली मुलं आता मोठी झाली आहेत. सँडी आणि डेनीस ही जुळी मुलं तशी सर्वसामान्य मुलांसारखीच. पण पौगंडावस्थेतले हे दोघे आई-वडिलांच्या प्रयोगशाळेत असताना अनवधानाने एका चालू प्रयोगात ढवळाढवळ करतात आणि काळाच्या सीमा ओलांडून अतिप्राचीन काळातल्या निर्मनुष्य वाळवंटात जाऊन पोचतात. हा काळ असतो ‘नोहा आणि त्याचे जहाज’ या बायबलमधील पौराणिक गोष्टीतला...या काळाची वाट हरवलेल्या मुलांना पुढे अनेक बऱ्यावाईट अद्भुत प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यातला अप्रतिम कल्पनाविलास वाचकांना खिळवून ठेवतो.