चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग हाच त्या उतारूंचा आसरा! थोडीशी वाईन व काही चॉकलेटस् एवढेच खाद्य! अपघात झाला तेव्हा फक्त ३२ जण वाचले होते. काही दिवसांत २७ उरले. मग १९ आणि शेवटी फक्त १६. शेवाळंही नसलेल्या बर्फाच्छादित पर्वतावर ७२ दिवस ते कसे जिवंत राहिले? कसे वागले? त्यांची सुटका कशी झाली? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले? याची ही रोमांचकारी सत्यकथा!