Skip to product information
1 of 1

Akhada By Saurabh Duggal

Description

ख्यातनाम कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी आखाडामधून सांगितली आहे. त्यांच्या राज्यातील (हरियाणातील) कुस्तीपटूंना ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात यश येत नव्हतं. त्यामुळे ही परिस्थिती बदललीच पाहिजे या निर्धाराने पेटून उठलेल्या महावीरसिंग यांनी आपल्या घरातील मुलांबरोबर मुलींनाही कुस्तीचं प्रशिक्षण द्यायच ठरवलं. बलालीसारख्या लहानशा खेड्यात मुलींनी कुस्ती शिकणं म्हणजे कुळाला बट्टा लावणं होतं. त्यामुळे महावीरसिंगांना घरच्या-दारच्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. तसंच बलाली गावात स्टेडियम नसल्यामुळे एक शेतजमीन भाड्याने घेऊन त्यावर त्यांनी ४०० मीटरचा ट्रॅक बनवला. त्या ट्रॅकवरून जो कोणी ट्रॅक्टर नेईल त्याच्याकडूनच ते ट्रॅकची दुरुस्ती करून घेत. या सगळ्या प्रयत्नांत गावकऱ्यांची त्यांना चांगली साथ होती. महावीर सिंग यांची ही मेहनत फळाला आली आणि यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या या कुस्तीपटूंनी आखाड्यात भरघोस यश संपादन केलं पराक्रम गाजवला. महावीर सिंगांची ही संघर्षगाथा यशोगाथा जाणून घेण्यासाठी आखाडा हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. कुस्तीचे प्रशिक्षक आणि कुस्तीपटू यांच्यासाठी तर ते मार्गदर्शक आहेच पण कोणत्याही क्रीडा प्रशिक्षकांना आणि क्रीडापटूंना ते प्रेरणा देणारं आहे.
Regular price
Rs. 220.00
Regular price
Sale price
Rs. 220.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Akhada By Saurabh Duggal
Akhada By Saurabh Duggal

Recently viewed product

You may also like