स्वामी विवेकानंदांच्या अज्ञात पैलूंवर या पुस्तकाने प्रकाश टाकला आहे. लेखक शंकर यांनी लिहिलेल्या मूळ बंगाली पुस्तकाचा डॉ. मृणालिनी गडकरी यांनी केलेला अनुवाद आहे. विवेकानंदांचे पाककौशल्य, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, त्यांनी परदेशात वेदांप्रमानेच बिर्याणीचा केलेला प्रसार, त्यांचे चहावारचे प्रेम, पशुपक्ष्यांविषयीचे प्रेम, त्यांना झालेले आजार आणि प्रकृतीच्या वारंवार होणाऱ्या तक्रारी, अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी केलेली कौटुंबिक निरवानिरव, स्वतःजवळ बाळगलेली गंगाजलाची कुपी आणि त्यांचे महानिर्वाण यासंबंधीची अपरिचित माहिती वाचकांसमोर येते. विवेकानंदांना त्यांच्या आईसाठी भाऊबंदकीत भाग घ्यावा लागला होता. कोर्टातही जावं लागलं होत, ही वेगळी माहिती समोर येते. परदेशातील दौऱ्यांमधील अनोळखी माहितीही समजते. पुस्तकात काही दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.