Skip to product information
-
Media gallery Media gallery
Adhyatmachya Shodhat by Sanjiv Shah
Description
Description
ज्या व्यक्ती जागरूक, सजग असतात; त्या दमन आणि स्वच्छंदीपणा या दोन्ही गोष्टींपासून लांब राहतात. संयमी धोरण अवलंबतात.मनाच्या सगळ्याच इच्छांना मारत नाहीत, तसंच बुद्धी गहाण ठेवून मनासमोर सपशेल शरणागतीदेखील पत्करत नाहीत.अशावेळी त्यांची जीवनयात्रा ही एक जागृतिपूर्ण यात्रा बनते,जिच्यात मनुष्य अनुभवातून शिकत शिकत परिपक्व होत जातो आणि सरतेशेवटी मन आणि इच्छा या दोघांवरही विजय मिळवतो…!एकदा का आपल्या अंत:करणात हा प्रकाश पसरला की मनुष्य अहंकाराच्या सगळ्या उलाढाली, त्याचे उपद्व्याप नीट पाहू शकतो. फुलायला कोणाला आवडणार नाही? पण फुलण्याबरोबरच कोमेजणंसुद्धा जोडलेलं असतं.आनंद उपभोगणं जितकं सुखदायक वाटतं, तितकंच अहंकारामुळे दुखावले जाऊन आपण दु:खदेखील भोगत असतो. खरंतर माणसाला अशा आनंदाची आस आहे, जो अहंकाराला पोषित केल्याने मिळत नाही. तर तो प्रेमाने अहंकाराचं निरसन झाल्याने मिळतो.मनुष्याच्या मनात जेव्हा शुद्ध, उन्नत आणि तेजस्वी जीवन जगण्याची उत्कट इच्छा उत्पन्न होते तेव्हाच आपण तिला आकांक्षा असं म्हणतो. आकांक्षा हेच /ध्यानावस्थेच्या सृजनाचं पहिलं पाऊल आहे.पण जी ध्यान प्रक्रिया आपल्याला एक अधिक चांगला मनुष्य बनवत नसेल, ती काय कामाची? ध्यानाची योग्य प्रक्रिया आपल्याला ज्या एका विशिष्ट हेतूच्या दिशेने जाते, तो हेतू आहे आपली प्रसन्नता. प्रफुल्लतादेखील अखेरीस एक परिवर्तनच आहे.मुक्ती आपल्याला स्वत:च्या कनिष्ठ ’स्व’तून मिळवायची आहे.समाधी ही अंत: करणाची जागृत अवस्था आहे.अनावश्यक दु:खदायक संबंधापासून मोकळं होणं हेच तर निर्वाण आहे.चित्ताची समाधी अवस्था हेच खरं कैवल्य आहे.
- Regular price
- Rs. 270.00
- Regular price
-
Rs. 300.00 - Sale price
- Rs. 270.00
- Unit price
- / per
-10%
Notified by email when this product becomes available
Adhyatmachya Shodhat by Sanjiv Shah