‘लोककथा’ हा प्रत्येक संस्कृतीचा अनमोल ठेवा असतो. प्रत्येक पिढीनं पुढच्या पिढीला तो जपण्यासाठी द्यायचा असतो, कारण त्यातून मनोरंजन तर होत असतंच; पण खूप शिकायला मिळतं, नवीन माहिती मिळते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना कानगोष्टींसारखं काळानुरूप त्याचं रूप बदलत जातं, पण त्यातला बोध मात्र त्रिकालाबाधितच राहतो. या पुस्तकात रशियन लोककथा वेगवेगळे भारतीय पोशाख घालून तुम्हांला भेटायला आल्या आहेत. वाचून बघा; नक्की आवडतील तुम्हांला.